Chala Hawa Yeu Dya World Tour with Veena World - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs

Breaking

Thursday, 4 January 2018

Chala Hawa Yeu Dya World Tour with Veena World
तमाम मराठी प्रेक्षकांना दरसोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागली ये तो प्रश्न म्हणजे हसतायना? हसायलाच पाहिजे. कारण सुरु होतोय चला हवा येऊ द्या चा विश्वदौरा. जिथे मराठी तिथे झी मराठीहे ब्रीद घेऊन वाटचालकरत असलेल्या झी मराठीने या विश्वदौऱ्याच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर एकधाडसी पाऊल टाकलं आहे. चला हवा येऊ द्या म्हणजे मराठी प्रेक्षकांचं हक्काचं मनोरंजन. मनोरंजनाचं हे वादळ आता पुन्हा परत येतंय. येत्या ८ जानेवारीपासून चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा सुरु होत आहे. दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात चला हवा येऊद्याची टीम आपल्या सोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे. चला हवाये ऊद्याने आत्ता पर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पोस्टमनकाका, शांताबाई, जज, वकिल, मामाभाचे, वादघालेसासूसून, पुणेरीबाई अशी वेगवेगळी पात्र आपल्या जगण्याचा भाग बनली. मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी या कार्यक्रमाने हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. पत्रांच्या माध्यमातून हसवताहसवता अंतर्मुखकेलं. आणि आता जगाच्या नकाशावर मोहोर उमटवायलाही सतरंगी मंडळी सज्ज आहेत.

८ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या चला हवा येऊ द्या विश्वदौऱ्याचं पहिलं स्टेशन आहे दुबई आणि अबुधाबी.  कॉमेडीची आतषबाजीतर होणारच आहे शिवाय बॉलिवूडपार्क, फेरारीवर्ल्ड अशा अनेक ठिकाणांची सफरही टीमप्रेक्षकांना घडवणार आहे.  चला हवा येऊद्याच्या कलाकारांसोबत दुबई अबुधाबीदौऱ्यात खासपाहुणी म्हणून येत आहेत जाडूबाईची टीम अर्थात निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे.  या दोन धमाल अभिनेत्रीं सोबत विश्वदौऱ्याचा पहिला भाग रंगणार आहे.  विश्वदौऱ्याच्या पुढील भागांमध्ये सुद्धा झी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकां मधले तुमचे लाडके चेहरे दिसणार आहेत.

स्टुडिओची चौकट मोडून जगाची सफरकरणारा मराठी टेलिव्हिजनवर चा हा पहिलाच कॉमेडीशो ठरावा. दुबई अबुधाबी पाठोपाठ लंडन,  पॅरिस,  जपान,  सिंगापूर,  बाली,  मॉरिशस,  साऊथआफ्रिका,  ऑस्ट्रेलिया आणि युएसए अशा जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांत धुमाकूळ घालायला ही टीम सज्ज आहे.  तेव्हा ८ जानेवारीपासून प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वा. करा जगाची सफर तुमच्या लाडक्या चला हवा येऊ द्या सोबत कारण जिथे मराठी तिथे झी मराठी.


Tag
Chala Hawa Yeu Dya Marathi Comedy Show,  Chala Hawa Yeu Dya Zee Marathi Serial, Chala Hawa Yeu Dya World Tour With Veena World, Chala Hawa Yeu Dya in Dubai, Ardabil, London, Paris, Japan, Singapore, Bali, Moorish, South Africa, Australia, USA, Bhau Kadam, Kushal Badrike, Nilesh Sabale, Chala Hava Yeu Dya Team  

Post Bottom Ad