Ye Re Ye Re Paisa Marathi Movie Review - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs

Breaking

Monday, 8 January 2018

Ye Re Ye Re Paisa Marathi Movie Review


Review : Ye Re Ye Re Paisa
Producer : Omprakash Bhatt , Swati Khopkar, Sujay Shankarwar, Rajesh Banga
Director : Sanjay Jadhav
Star Cast : Umesh Kamat, Tejaswini Pandit, Siddharth Jadhav, Sanjay Narvekar, Anand Ingle, Bejoy Anand, Mrinal Kulkarni & Vishakha Subhedar
Story & Screenplay : Sanjay Jadhav & Arvind Jagtap
Review By : Mukta Shinde

Review :


         दुनियादारी (२०१३) चित्रपटापासून घरोघरी पोहोचलेले प्रसिध्द दिग्दर्शक म्हणजे संजय जाधव. संजय जाधव यांचे “चेकमेट” आणि “रिंगा रिंगा“ हे दोन चित्रपट ज्यांनी पाहिलेत त्यांना “येरे येरे पैसा” मधील हेराफेरी तितकीशी भावणार नाही, कारण यावेळी चित्रपटात केवळ अँक्शनचा थरार न ठेवता विनोदाची फोडणी देखील दिली आहे पण “सिंघम” रोहित शेट्टींच्या स्टाईलने केलेली अँक्शन देखील (गाड्यांची उडवा उडवी) मज्जा आणते.

      “येरे येरे पावसाची” कथा प्रमुख तीन पात्रांभोवती फिरते. तसेच सोबतीला खलनायक आणि बराच फौजफाटा आहे. हि कथा आहे आदित्य (उमेश कामत), सनी (सिद्धार्थ जाधव) व बबली (तेजश्विनी पंडित) या तिघांच्या आयुष्यात पैश्यामुळे होणांऱ्या उलाढालीची आहे. आदित्यला हिरो व्हायचे आहे. त्याचा आदर्श आहे शाहरुख खान. बबलीला देखील हिरोइन व्हायचय तिची आदर्श आहे दीपिका पदुकोन तर सनी आहे सिनेमाचा तिकीट ब्लाक करणारा व बाबलीच्या आकंठ प्रेमात बुडालेला. हे सगळेच जन आयुष्यात चाचपडत असतात त्यांची गाठ पडते अण्णांशी (संजय नार्वेकर) अण्णांचे पैसे या तिकडीमुळे (आदित्य, सनी, बबली) हरवले आहेत, ते वसूल करण्यासाठी अण्णा त्यांच्या मागावर आहे. अण्णाला पैसे परत करण्याच्या बोलीवर बाहेर पडलेला आदित्य पैश्याचा शोधात विजय मेहरा (विजॉय आनंद) व जान्हवी मुजुमदार (मृणाली कुलकर्णी) यांच्यापर्यंत पोहोचतो. बबली व सनी हे पैशाच्याच पाठी आदित्य पर्यंत पोहचतात व हे सर्व बिंदू एकत्र आल्यानंतर रंगतो पाठशिवणीचा खेळ.

      नेमके हा पाठशिवणीचा खेळ कसा आहे हे तुम्हाला चित्रपट पहिल्या नंतर कळेलच. येरे येरे पैसाची भक्कम बाजू म्हणजे नेटकं दिग्दर्शन आणि सहजसुंदर अभिनय. संजय जाधव यांनी आपली फेवरेट स्टारकास्ट बाजूला ठेऊन नाविन्याला संधी दिली आहे ते कौतूकास्पद आहे. सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. उमेश कामट आणि तेजस्विनी पंडित देखील चित्रपटात सहज वावरलेत आहेत. विशाखा सुभेदार आणि आनंद इंगळे यांसारखे विनोदवीर चित्रपटात मज्जा आणतात. मृणाल कुलकर्णीने आजवरच्या भूमिकेच्या तुलनेत वेगळ्या घाटनिची भूमिका केली आहे. विजॉय आनंद यांची घोतेखणी भूमिका सरप्राइज आहे.

      चित्रपटतील संवाद आहेत अरविंद जगताप यांचे (हे नावच पुरेस आहे) चित्रपटातील गाणी कंटाळवाणी वाटतात मात्र परिस्थितीमधून निर्माण होणार्या विनोदामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाना वाटत नाही. नव्या वर्षाच्या सुरवातीला डोक्याला कोणताही शॉट न लावता केवळ कारमनुकीकडे घेऊन जाणारा चित्रपट आहे. येरे येरे पैसा एकदा पाहायला हरकत नाही.  

Tag
Ye Re Ye Re Paisa Marathi Movie Review, Ye Re Ye Re Paisa Review, Ye Re Ye Re Paisa First Day Earning, Ye Re Ye Re Paisa Estimate Earning, Ye Re Ye Re Paisa Box Office Collection, Ye Re Ye Re Paisa Marathi Movie, Ye Re Ye Re Paisa Full Marathi Movie Download

Post Bottom Ad