Javed Ali's new marathi song 'Mann Ugach Haste Kashamule' From Memory Card Marathi Movie - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs

Breaking

Thursday, 15 February 2018

Javed Ali's new marathi song 'Mann Ugach Haste Kashamule' From Memory Card Marathi Movie


जावेद अली ने आत्तापर्यंत अनेक गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र ‘मेमरी कार्ड‘ सिनेमातील लव्ह सॉंगने माझ्यासाठी सॉंग ऑफ द इयर असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी दिलेलं संगीत माझ्या काही खास कंपोझिशन्स मध्ये राहील. येत्या २ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची मी आतुरतेने वाट पाहतोय.

माझे गुरु आणि संगीतातील आयडियल महोम्मद रफी यांच्या गाण्यांना असलेला गोडवा साधेपणा या दोघांनी नेमके पणाने या गाण्यात उतरविला. प्रेम ही एकमेव भावना जी जगाच्या पाठीवर कायम आणि सारखीच आहे अशी भावना गाण्यात ऐकायची असेल तर प्रितेश-मितेश यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ‘मन उगाच हासते कशामुळे, हृदय ही धडकू लागते कुणामुळे‘!… ‘मेमरी कार्ड‘ सिनेमातील एव्हरग्रीन सॉंग रेकॉर्ड करताना मी सुद्धा जवळपास दोन तास घेतले आणि त्यातील प्रत्येक क्षण माझ्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करून घेतला.


Tag
Javed Ali, Javed Ali Marathi Song, Memory Card Marathi Movie Songs Download, Mann Ugach Haste Kashamule Marathi Mp3 Song Download, Memory Card Marathi Songs Download, Javed Ali Songs Download

Post Bottom Ad