दोस्तीगिरी सिनेमाचा टिझर झाला लाँच ! - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs

Breaking

Tuesday, 17 July 2018

दोस्तीगिरी सिनेमाचा टिझर झाला लाँच !


कॉलेजविश्वातल्या अनकन्डिशनल मैत्रीला सेलिब्रेट करणारा दोस्तीगिरी सिनेमा 24 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो अशा त-हेच्या तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या डायलॉग्समूळे सोशल मीडियावर रिलीज झालेल्या दोस्तीगिरीच्या टिझरला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्यासंदर्भात निर्माते संतोष पानकर म्हणतात, “मनोज वाडकर ह्यांनी लिहीलेले डायलॉग्स पटकन लक्षात राहणारे आणि तोंडात बसणारे आहेत. तरूणाईला वनलाइनर्स आणि अशा त-हेचे संवाद खूप आवडतात. त्यामूळे युवावर्गाला हा सिनेमा नक्कीच आवडेल असं आम्हांला वाटते.

संतोष पानकर निर्मितविजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठकअक्षय वाघमारेविजय गितेपुजा मळेकरपुजा जयस्वाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. 'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्सप्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्सनिर्मित "दोस्तीगिरी" या चित्रपटाची कथापटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन ह्यांचे संगीत असलेला दोस्तीगिरी चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे.

Tag
Dostigiri Marathi movie, dostigiri movie trailer, dostigiri movie songs, dostigiri Marathi movie trailer doeblodo

Post Bottom Ad